Rahul Narvekar  Saam Tv
महाराष्ट्र

Winter Session : विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक आक्रमक, राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

विरोधक उद्या विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे.

Rashmi Puranik

नागपूर : हिवाळी अधिवेशन तापलेलं असताना विरोधक आता थेट विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर विरोधक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे. (Latest Marathi News)

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. अध्यक्ष बोलू देत नाही अशी तक्रार आमदारांची होती. त्यामुळेच विरोधकांनी ही भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जयंत पाटलांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर दीशा सालियन मृत्यू प्रकरणातही सत्तादारी पक्षाकडून जवळपास 14 आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली होती.

मात्र विरोधकांकडून केवळ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाच बोलण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक अविश्वास ठराव मांडणार आहेत. मात्र महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तसेच हा प्रस्ताव नामंजूर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडी आक्रमक होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

SCROLL FOR NEXT