sambhajiraje chhatrapati  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati On Lok Sabha Election : 'स्वराज्य' लाेकसभा लढविणार? संभाजीराजे छत्रपती स्पष्टच बाेलले...

शेवटी भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं जावं ही माझी अपेक्षा आहे असे राजेंनी नमूद केले.

विजय पाटील

sambhajiraje chhatrapati news :

सध्या स्वराज्य संघटनेचे (swarajya sanghatana) लक्ष विधानसभा असून लोकसभेबाबत निर्णय ठरलेला नाही. अजून वेळ आहे पण सध्या तरी आम्ही (स्वराज्य संघटना) विधानसभा निवडणूकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगलीत स्पष्ट केले. (Maharashtra News)

दरम्यान राम मंदिर (ram mandir) आणि राम हे सर्वांचे दैवत आहेत. इतिहासामध्ये तसे पुरावे देखील आहेत. आज राम मंदिर अयोध्यामध्ये (ayodhya) स्थापन होत आहे ही कौतुकाची बाब असून राम मंदिर पूर्ण होत आहे. त्यास माझ्या शुभेच्छा असल्याचे संभाजीराजेंनी नमूद केले.

राजे म्हणाले सन 2007 पासून मराठा आरक्षणाबाबत (maratha aarakshan) मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकतो या बाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार आणि मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकदा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे आता सरकार कसं आरक्षण देणार आहे ये स्पष्ट सांगायला हवे. सरकार ज्या पद्धतीने आरक्षण देतो म्हणतोय हे कसे देणार आहात हे सांगावे हा माझा सरकारला सवाल आहे असंही संभाजीराजेंनी नमूद केले.

शेवटी भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं जावं ही माझी अपेक्षा आहे असे राजेंनी सांगली येथे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT