Ravikant Tupkar, BJP, Ashish Deshmukh saam tv
महाराष्ट्र

Will Ravikant Tupkar Joins BJP : रविकांत तुपकर भाजपाच्या गळाला लागणार? तुपकरांनी स्पष्टच सांगून टाकलं

swabhimani shetkari sanghatana : माझ्या सारखा कार्यकर्ता सभागृहात असा अशी भावना आशिष देशमुखांची आहे.

संजय जाधव

Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना भाजपात यावे अशी खुली ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर तुपकर स्विकारणार का याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

शेतक-यांचे हित साधायचे असेल तर रविकांत तुपकर यांनी भाजपात यावे असे भाजपचे (obc सेलचे नेते) आशिष देशमुख यांनी रविकांत तुपकर यांना खूली ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे हित जाेपासले जात आहे. तसेच भाजपास देखील तुपकरांच्या माध्यमातून एक धडाडीचा नेता मिळेल असेही देशमुख यांनी नमूद केले.

आत्ताच बाेलणे उचित ठरणार नाही - तुपकर

या ऑफरबाबत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना आशिष देशमुख यांनी मला भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली हे मला माध्यमाच्याच माध्यमातून कळलं आहे. मला कुठल्याही भाजप नेत्याने किंवा कार्यकर्त्याने विचारणा केलेली नाही.

त्यामुळे आशिष देशमुख यांनी जरी ऑफर दिली असेल तरी ते माध्यमातूनच आहे. कुठल्याही भाजप नेत्याचा मला फोन आला किंवा ऑफर आली तरच मी त्यावर वक्तव्य करेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT