ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघात शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरप्रमुख शैलेश वडनेरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसेच बंडाचा झेंडा फडकावण्याचा इशारा दिलाय.
लोकसभेत ज्यांनी विरोधात काम केलं, त्यांना पक्षात घेऊ नका, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते विधानसभेसाठी मागील अडीच वर्षांपासून झटत असून लोकसभेतही जिवाचं रान करून कार्यकर्त्यांनी बाळ्या मामा म्हात्रे यांना खासदार म्हणून निवडून आणलं. मात्र त्यावेळेस ज्यांनी विरोधात काम केलं, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाणार असेल, तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू असा निर्धार शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे मविआच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात भाजपाला विरोध करण्यासाठी समविचारी पक्ष आणि घटक पक्षांमधून महाविकास आघाडीची निर्मिती झाली खरी... मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष छोट्या पक्षांना गृहीत धरत असल्याचा आरोप जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केला. प्रत्येक निवडणुकांमध्ये आमचा वापर सोयीपुरता केला जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात जनता दलाच्या वतीने कागल, चंदगड आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याचा निर्धार आज करण्यात आला.
गडहिंग्लज इथं जनता दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कागल विधानसभा मतदारसंघातून स्वाती कोरी, चंदगड विधानसभा मतदारसंघातून बाळेश नाईक तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शरद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.