Anandacha Shidha, Jalna, Ration Card  saam tv
महाराष्ट्र

Anandacha Shidha : 'आनंदाचा शिधा' तील डाळ गेली कूठं ?

हा शिदा पासष्ट टक्के रेशन दुकानात पोचलाच नाही असे चित्र आहे.

लक्ष्मण सोळुंके

Anandacha Shidha : राज्य सरकारच्या वतीने दिवाळीच्या (diwali) तोंडावर राज्यातील जनतेला दिवाळी उत्साहात साजरा करता यावी म्हणून मोठा गाजा वाजा करत १०० रुपयात आनंदाच्या शिदयाच्या वाटपाची घोषणा करण्यात आली. मात्र अनेक जिल्ह्यातील या शिदयातील चना डाळच गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Anandacha Shidha Latest Marathi News)

आनंदाच्या शिदयातील चना डाळ गेली कुठं असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जालना (jalna) जिल्ह्यातील १२८० रेशन दुकानात ५ लाख ७५ किलो शिदा वाटपाचे उद्दिष्ट राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले. यामध्ये १०० रुपयात रवा, साखर, पामतेल, चना डाळ रेशनकार्ड धारकांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra News)

हा शिदा पासष्ट टक्के रेशन दुकानात पोचलाच नाही असे चित्र आहे. ज्या दुकानात हा शिदा पोचला त्या पैकी तीन टक्के दुकानात चना डाळ पोहचली नसल्याने ही डाळ नेमकी गायब झाली कुठं ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना हा शिदा काही दुकानदारांपर्यंत पोचलाच नसल्याने हा शिदा दिवाळी नंतर ही आठ दिवस वितरित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान गायब झालेली चना डाळ शिद्यात त्यावेळी मिळणार का असा सवाल उपस्थित हाेते. आहे. सध्या दिली जाणार डाळ गेली कुठं ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार की काय अशी चर्चा आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT