Speculation rises over a possible second split in UBT Sena as leaders claim 14 MLAs may defect to the Shinde camp. saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

Ubt Sena 14 Mlas Defection Claim Shinde Camp: 6 फुटीर खासदारांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाचा मुहूर्त फिक्स नसताना ठाकरेसेनेला पुन्हा खिंडार पडण्याचा दावा केला जातोय. त्यामुळे ठाकरेसेनेचा सुपडासाफ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय...मात्र ठाकरेसेनेत नव्या फुटीचा दावा नेमका कोणी केलाय? ठाकरेसेनेचे आमदार खरचं फुटणार आहेत का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ठाकरेसेनेतील 6 खासदारांच्या बंडानंतर 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झालयं... 4 वर्षांनंतर दुसऱ्या फुटीमुळे ठाकरेसेनेत अस्वस्थता आणखीनच वाढलीय....6 बंडखोर खासदार शिंदेसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालाय...मात्र आता ऑपरेशन टायगर आमदार फोडण्यासाठी राबवलं जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. ठाकरेसेनेचे 14 आमदारही लवकर शिंदेसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगरांनी केलाय.. तर आमदार आणि नगरसेवकांमध्ये खदखद असल्याचं मंत्री शंभुराज देसाई म्हणालेत...

शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासात अनेकवेळा बंड झाले. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शिवसेनेला सहन करावा लागलाय. शिवसेना सोडून बंडखोरी करणारा पुन्हा निवडून येत नव्हता, हा इतिहास खरा आहे. मात्र निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही काही जण राजकारणात पुन्हा यशस्वी झालेत. तर काहींना मोठं अपयश पचवावं लागलयं...विशेष म्हणजे शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासात 2022 साली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात झालेली फुट सर्वात मोठी होती... मात्र या फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपलं राजकीय अस्तित्व कसं टिकवलं... पाहूयात...

शिंदेसेनेसोबत गेलेल्या 12 खासदारापैकी सहा जण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले... तसचं शिंदेसेनेत आलेल्या 40 आमदारांची संख्या 2024 च्या निवडणुकीत वाढून 56 वर पोहचली....

याउलट ठाकरेसेनेकडे राहिलेल्या 6 खासदारांची संख्या वाढून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 9 झाली...तर शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेसेनेत 16 आमदारच शिल्लक होते... मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेसेनेची आमदारसंख्या 20 वर पोहचली...

त्यामुळे ठाकरेसेनेत असणाऱ्या 20 आमदारांपैकी 14 आमदार भविष्यात फुटल्यास ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल...याआधी मंत्री उदय सामंतांनी स्वत: ठाकरेंचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं... त्यामुळे खासदारांच्या ऑपरेशनची जबाबदारी जशी डॉ. श्रीकांत शिंदेंकडे देण्यात आली... तशीच आमदारांच्या फुटीची जबाबादारी मंत्री उदय सामंतांकडे दिली जाणार का? उद्धव ठाकरे आमदारांची ही संभाव्य फुट नेमकी कशी रोखणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

बंडखोर खासदाराचं ठाकरेसेनेकडून पिंडदान, खासदार फुटले, शिवसैनिक संतापले, कुठे अंत्ययात्रा, तर कुठे जोडेमारो

कुत्रे झुंडीत येतात, वाघ एकटा येतो; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

SCROLL FOR NEXT