Beed News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! विम्याचे १ कोटी मिळविण्यासाठी सुपारी देऊन पतीची हत्या

आरोपी पत्नीसह दोघांना अटक तर दोघांचा शोध सुरू

विनोद जिरे

बीड - पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, चक्क एका महिलेने सुपारी देऊन पतीचा काटा काढला आहे. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी अपघात झाल्याचं भासविलं. मात्र बीड (Beed) पोलिसांनी (Police) कौशल्यपूर्ण तपास करुन या सिनेस्टाइल हत्येचा उलगडा केला. मंचक पवार असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

हे देखील पाहा -

11 जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता. यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचं भासविण्यात आलं होतं. तर यादरम्यान पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला 1 कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, 10 लाख रुपयांची दिली. त्यापैकी 2 लाख रुपये इसार म्हणून मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोपी पत्नी, श्रीकृष्ण बागला, वैजीनाथ गव्हाणे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील पत्नीसह 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार आरोपींचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये हायव्होल्टेज लढत; महापालिका निवडणुकांमध्ये बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला|VIDEO

राज आणि उद्धव एकत्र आले तर काय? CM फडणवीसांनी ४ शब्दात विषय संपवला

Astrology: बुध ग्रहाची 'या' ३ राशींवर असणार कृपा, धन प्राप्तीसह मिळेल प्रसिद्धी

Maharashtra Live News Update: विरोधकांच्या पागडी गुल होऊ लागल्यात - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Zilla Parishad Election: जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार? महापालिकांसाठी घोषणा झाली, ZP निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार?

SCROLL FOR NEXT