Chhatrapati Sambhajinagar 
महाराष्ट्र

Wife Killed Husband : पैशांपुढे नातं हरलं! जमिनीच्या वाटणीसाठी पत्नीने पतीलाच संपवलं

Crime NEws : पत्नीने पतीची विहिरीत ढकलून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेताच्या हिस्स्यासाठी पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पत्नीने पतीची विहिरीत ढकलून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

पतीने आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र पोलिसांना पत्नीवर संशय आल्याने पोलिसांना सखोल तपास केला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर शेतीच्या वाटणीवरून पतीला संपवल्याचं पत्नीने कबूल केलं आहे. (Crime News)

वैजापूर तालुक्यातील हिलालपूर शिवारातील आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. शेत जमिनीच्या वाटणीसाठी दुसऱ्या पत्नीनेच विहिरीत ढकलून पतीचा खून केल्याची बाब तपासात समोर आली आहे. शिऊर पोलिसांनी अवघ्या 72 तासात या हत्येचा छडा लावला आहे.  (Maharashtra News)

सुदाम राजू झिंजुर्डे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कमलाबाई सुदाम झिंजुर्डे असे आरोपी महिलेचे नाव आहे. पत्नीनेच हत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वाटणीसाठी पत्नीने पतीलाच संपवलं (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

SCROLL FOR NEXT