Police arrest wife and her lover after shocking attempt to kill husband using electric shock in Yavatmal village. Saam tv
महाराष्ट्र

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Wife Tries To Kill Husband With Electric Shock In Maharashtra: विवाहबाह्य संबंधांमुळे पतीनं पत्नीची किंवा पत्नीनं पतीची हत्या केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र पत्नीनं पतीचा अडसर दूर कऱण्यासाठी थेट विजेचा शॉक दिल्याचं हे केवळ तुम्ही सिनेमात पाहिलं असेल...मात्र हे प्रत्यक्षात घडलंय..नेमकं काय आहे हे प्रकरण..पाहूया हा रिपोर्ट.........

Suprim Maskar

पत्नीनं आपल्या प्रियकरासाठी थेट पतीला आयुष्यातून उठवण्याचा भयानक कट रचला...यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या पंगडी गावात गजानन मोरे आणि कवडी मोरे या नवरा-बायकोच्या आयुष्यात विष्णू आत्रामची एण्ट्री झाली. विष्णू आणि कवडीनं गजाननचा काटा काढायचं ठरवलं, गजानन मोरे आपल्या घरात गाढ झोपेत असताना कवडी मोरेनं प्रियकर विष्णू आत्राम यांच्या सांगण्यावरून रात्री 2 वाजता विजेच्या वायरला अॅल्युमिनियमची तार जोडली आणि झोपलेल्या गजानन मोरे याला विजेचा शॉक दिला.

अंगातून विजेचा प्रवाह जाताच गजानन यांना मोठा झटका बसला. सुदैवाने, या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. पत्नीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं लक्षात येताच पोलिसांत तक्रार दिली. या दोघांना अटक करण्यात आलीय.

गजानन यांना आपल्या पत्नीच्या आणि विष्णू आत्रामच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागली होती. त्यांनी वारंवार यावर आक्षेप घेतला होता, घरात वादावादीही झाली होती. पण हा वाद थेट जीवावर बेतेल, असं गजानन मोरेंना स्वप्नातही वाटलं नव्हतं... अनैतिक संबंधांच्या हव्यासापोटी संसाराची राखरांगोळी करण्याआधी एकदा आपल्या जोडीदाराचा जरूर विचार करा...अन्यथा कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली एक चूक तुम्हाला उद्ध्वस्त उद्धवस्त करायला पुरेशी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT