sharad pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: संजय राऊतांवर कारवाई करायची गरजच काय? शरद पवारांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे आज बैठक झाली ती कशासाठी झाली याबाबत पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Narendra Modi and Sharad Pawar) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे आज बैठक झाली आहे. ही बैठक संसदेतील पंतप्रधान कार्यालयात झाली आहे. या भेटीने राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. सध्याचं राज्यातील राजकारण शिवसेना विरुद्ध भाजप, अशा तीव्र संघर्षात सुरु असून, ही भेट नक्की कोणत्या कारणाने झाली असेल याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या याच पार्श्वभूमिवर आता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली.

संजय राऊतांवर (Sanjay Raut) कारवाई करायची काय गरज होती? असा सवाल करत आपण आज पंतप्रधानांशी केवळ १२ आमदाराच्या प्रश्नावर चर्चा केली असून ते विचार करुन निर्णय घेतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

मात्र, यावेळी नवाब मलिकांवरील कारवाईवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) भाजपविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजप सोबत नव्हतो असही पवार म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाया महाराष्ट्रात वाढलेल्या असतानाच, शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असून तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप नेत्यांकडून होत असतानाच, या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेली भेट महत्वाची मानली जात होती मात्र आता पवारांनी या भेटीत तपास यंत्रणांच्या करावाईवर काहीच चर्चा झाली नसल्याचं जाहीर केल्याने राजकीय चर्चांना विराम मिळाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT