nilesh rane uddhav thackeray 
महाराष्ट्र

'पहिले मुख्यमंत्री असतील की जे बोलतात ते त्यांचा पक्षच पाळत नाही'

साम टिव्ही ब्युरो

सातारा : राज्यातील धार्मिक स्थळांवर आज सकाळपासून सामान्य जनतेपासून नेते मंडळींची आपल्या लाडक्या भगवंताच्या दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब मुंबा देवीचं दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काेविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे म्हटलं. त्यावर निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी जनतेला भीती दाखवू नये असेही म्हटलं आहे. why-shivsena-is-conducting-dasra-melava-in-corona-pandemic-nilesh-rane-uddhav-thackeray-sml80

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. जनतेने कोरोना नियमांचं पालन करावं अशी प्रार्थना केली पण शिवसेना दसरा मेळावा घेणार. पहिले मुख्यमंत्री असतील की जे बोलतात ते त्यांचा पक्षच पाळत नाही. कोरोनाची भीती दाखवणं कमी करा आणि जनतेला जे गरजेचे आहे ते द्या.

स्वतःच्या पक्षाचा दसरा मेळावा जवळ आला म्हणून आता जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी, कुठे काही तरी चालू केले आहे असे दाखवतील, परंतु यांचं ध्येय वेगळंच आहे. जनता आता वेडी नाही आहे. तुम्ही दसरा मेळावा घ्या, मग आम्ही पण कोरोना नियम पाळतो बघा अशी प्रतिक्रिया राणेंच्या ट्विटवर एकाने नमूद केली आहे.

दरम्यान ११ ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लाज वाटली पाहिजे या पक्षांना, जनता कोरोना व आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे, व्यापारी व उद्योगधंदे पूर्णपणे विस्कटले आहेत, राज्यात बेरोजगारी वाढली, त्यात उत्तर प्रदेश येथे जे घडलं ते खरं की खोटं हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT