Maharashtra Politics News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?; सांगितला तो किस्सा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics News: काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त विधानभवन येथे त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते देखील उपस्थित होते. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील त्यांच्याशी जोडलेले काही आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून आतापर्यंत अनेक नेत्यांनी हाती शिव बंधन बांधले आहे. तर अनेकांनी शेवसेना सोडली आहे. शिवसेनेत येणे आणि शिवसेना सोडणे असा सर्व प्रवास नारायण राणे यांनी सांगितला आहे. तसेच त्यांनी शिवसेना नेमकी का सोडली हा किस्सा देखील त्यांनी सांगितला आहे.

" बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या कारकीर्दीत खूप नाव कमावले. त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं, सत्ता नव्हती मात्र तरीही त्यांच्या कामामुळे आणि स्वभावामुळे देशाचे पंतप्रधान देखील स्वतः त्यांची भेट घेण्यासाठी येत होते. मी या देशात त्यांच्यासारखा दुसरा कोणी माणूस पाहिला नाही. सत्ता नसतानाही बाळासाहेबांनी मोठा मान सन्मान मिळवला. ते एकमेव असे होते, असे नारायण राणे काल आपल्या भाषणात म्हणाले.

" मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा बाळासाहेबांनी मला आधार दिला. त्यांनी मला मंत्री, आदर, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अशी अनेक पदे दिली. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणे हे मी भाग्य मानतो. काही कारणास्तव नंतर मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने बाळासाहेब दुखावले गेले. मात्र यामागे असलेलं कारण फार मोठं होतं", असं राणे म्हणाले.

पुढे शिवसेना सोडण्याचं कारण सांगताना त्यांनी म्हटले की, " ज्या दिवशी मी हा निर्णय घेतला तेव्हा बाळासाहेब अगदी शांत होते. मात्र त्यांनी माझे मन समजून घेतले. दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला होता. ते मला म्हणाले की, नारायण उठलाय का तू? मी म्हणलं हो साहेब. त्यावर ते मला म्हणाले की, काही हरकत नाही तू पुन्हा विचार कर आणि परत ये. मात्र यावेळी मी मौन बाळगून होतो. त्यामुळे बाळासाहेब स्वतःच ठीक आहे म्हणले आणि त्यांनी कॉल कट केला. हा संवाद आजही माझ्या आठवणीत आहे."

23 जानेवारीला संपन्न झालेल्या कार्यक्रमात सर्वच मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. तसेच आपल्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही आठवणी सांगितल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT