Sadabhau Khot Latest Marathi News, NCP News भारत नागणे
महाराष्ट्र

Sadabhau Khot : तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता; सदाभाऊ खोत यांचा गंभीर आरोप

सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ यांची वाट अडवली होती

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओत सदाभाऊ यांना एक हॉटेलमालक उधारी चुकवण्याची मागणी करताना दिसून येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला येथील (Solapur District) अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ यांची वाट अडवली होती. दरम्यान, वाट अडवणारा दुसरा कुणी नसून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता होता. असा दावा सदाभाऊंनी केला. (Sadabhau Khot Latest Marathi News)

इतकंच नाही तर, या कार्यकत्याने माझ्या अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. असं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलं. त्याचबरोबर या प्रकरणात पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सुद्धा सदाभाऊ खोत यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

'पंचायतराज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने मी सोलापूर दौऱ्यावर आहे, गुरूवारी मी सांगोल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे', अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

सदाभाऊंची वाट कुणी अडवली?

गुरूवारी सदाभाऊ खोत हे सोलापुरातील सांगोला येथे आले होते. दुपारी पंचायत समितीच्या आवारात ते आले असताना, त्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोरच सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने अडवलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत अशोक शिनगारे यांनी भररस्त्यात सदाभाऊंची वाट अडवली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालकाची समजूत काढून सुटका करून घेतली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT