नारायण राणेंना अटक कोण करणार, पुणे पोलीस की नाशिक पोलीस?  
महाराष्ट्र

नारायण राणेंना अटक कोण करणार, पुणे पोलीस की नाशिक पोलीस?

नारायण राणे यांच्याविरोधात पुणे नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात (Narayan Rane) पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात आणि नाशिक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश मिळाल्यानंतर नारायण राणेंच्या अटकेसाठी पुणे आणि नाशिक पोलीसांचे पथक चिपळूनला रवाना झाले आहे. नारायण राणे यांच्याविरोधात पुणे नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपुर्ण राज्यातील वातावरण चिघळले आहेत तर युवासेनाही आक्रमक झाली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी, नारायण राणेंच्या अटकेचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे. मात्र नारायण राणेंना अटक कोण करणार आता हाच प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे पुणे पोलिसांचे एक पथक राणेंच्या चौकशीसाठी चिपळूणला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलीस चिपळूणला न जाता रत्नागिरीत राणेंना अटक करणार असल्याची माहिती आहे. आता नारायण राणेंना पुणे पोलीस अटक करणार की नाशिक पोलीस अटक करणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील विविध शहरात शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक आणि पुण्यानंतर महाडमदध्येही शिवसेनेने राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बदनामीकारक वक्तव्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होईल, यामुळे विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंचे विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रारदारांनी आपली भावना दुखावल्याचं म्हंटल आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Monday Horoscope: कामाचा ताण वाढेल, 5 राशी होणार मालामाल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT