Kapil Sibal argument on Shiv Sena case democracy concerns India saam tv
महाराष्ट्र

खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

Shiv Sena Symbol Dispute Supreme Court Latest Update August 2026: शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून मोठी अपडेट समोर आली आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे वादात पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे. कपिल सिब्बल यांनी लोकशाहीबाबत गंभीर मुद्दे मांडले.

Omkar Sonawane

शिवसेना फुटीनंतर चिन्ह आणि पक्ष कोणाच हे प्रकरण गेल्या 3 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 च्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले असून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे.

महाविकासआघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी जून 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड केले, त्यांच्यासोबत 40 आमदारांनी उठाव करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर दोन्ही शिवसेनेचा वाद निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. या प्रकरणाची 3 वर्ष सुनावणी झाली. मात्र अजुनही निकाल लागलेला नाहीये, निवडणुका आयोगाच्या निर्णयाला आव्हान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दिलेय.

सुप्रीम कोर्टात काय झालं? कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांमध्ये सुनावणी होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजुनही सुरुच आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणात आता निर्णय घेण्याची गरज आहे. 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती आणि आज 2026 सुरू आहे. मी कधीच तारीख मागितली नाही. जर दहावी अनुसूची बघितली तर हे खूप वेगळे आहे.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या खासदार हे अशा पक्षात सामील झाले आहे ज्याच्या प्रतिनिधित्व संसदेमध्ये देखील नाहीये. सध्या लोकशाहीचा फज्जा उडवला जात आहे. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे सर्व मुद्दे एकत्रित करून देण्याचे आदेश दिले. पुढची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: खड्ड्यांवरून ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांची बाचाबाची, नाशिक महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा

VIDEO : पुलावरील रस्त्याला भेगा, एका बाजूच्या भिंतीला तडे...मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास धोकादायक

बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ! अवघ्या ५ मिनिटांत बनवा फ्लॉवरची गरमागरम भजी

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये युवक काँग्रेसकडून खासदार कंगना रनौत यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न,रस्त्यावर ठिय्या आंदोलन

Jalgaon: हॉटेलच्या मागे शेतात अश्लिल कृत्य, पोलिसांनी धाड टाकली; १३ पुरुष अन् १० महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं

SCROLL FOR NEXT