Rebel MPs skip party meeting, triggering debate over whip violation and disqualification under India’s anti-defection law. saam tv
महाराष्ट्र

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Shiv Sena Rebel MPs Face Disqualification Threat After Ignoring Whip: बंडखोर खासदारांनी ठाकरेसेनेनं बजावलेला व्हीप झुगारल्यानं पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. खासदारांनी व्हीप झुगारल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं का?, कायदा नेमकं काय सांगतो? पाहा यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

ठाकरेसेनेतील 6 खासदारांच्या फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. दिल्लीतील संसदीय पक्षाच्या बैठकीला सर्व 6 फुटीर खासदारांनी दांडी मारलीये. त्यामुळे पक्षाचा व्हीप झुगारुन ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील गैरहजर राहिल्यानं ते लवकरच शिंदेसेनेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरेसेनेकडून या बंडखोर खासदारांना नोटीस बजावली असून नोटिसीला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळही देण्यात आलाय. इतकंच नव्हे तर बंडखोर खासदारांची खासदारकी रद्द करण्याच्या दृष्टीनं ठाकरेसेनेनं पावलं उचलली आहेत.

मात्र, या पक्षफुटीमुळे एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. पक्षाचा व्हीप झुगारणाऱ्या खासदारांवर पक्षाकडून अपात्रतेची कारवाई होऊ शकते का?. सुप्रीम कोर्टानं याबाबत काय निर्णय दिलाय ते पाहूयात...

'व्हीप'वर सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

व्हीप केवळ विधानसभा किंवा संसदेच्या सभागृहातच लागू होतो

1992च्या किहोटो होलोहान विरुद्ध झाचिल्हू खटल्यानुसार पक्षांतर्गत बैठकीसाठी व्हीप लागू होत नाही

व्हीप आमदार, खासदारांच्या सभागृहातील वर्तनाशी संबंधित

व्हीपचं उल्लंघन केल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार खासदारांचं सदस्यत्व जाऊ शकतं

हॉटेल, कार्यालय किंवा पक्षाच्या अंतर्गत बैठकीला गैरहजर राहिल्यास आमदारकी-खासदारकी जात नाही

पक्षाची बैठक टाळल्यास पक्षांतर्गत कारवाई शक्य मात्र लोकप्रतिनिधी पद हिरावून घेता येणार नाही

एखादा खासदार फुटल्यास नेमकी कोणती कायदेशीर आणि संवैधानिक प्रक्रिया लागू होते? ते अपात्र ठरणार की त्यांचा स्वतंत्र गट स्थापन होणार? यासंदर्भात तज्ज्ञांनी तांत्रिक बाबींवर भाष्य केलंय.पक्षाचा व्हीप मोडल्यानं फुटीर खासदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मात्र कायद्यानं पक्षांतर्गत शिस्त आणि घटनात्मक अपात्रता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बंडखोरांची खासदारकी जाणार की राहणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबईहून ४८ मिनिटात पुण्यात पोचणार

SCROLL FOR NEXT