kolhapur internet service Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Internet Service Update : काेल्हापूरातील इंटरनेट सेवा काेलमडली, युवा वर्ग भडकला; Work From Home वाल्यांची झाली माेठी

Siddharth Latkar

Kolhapur Internet Service News : काेल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात अद्याप इंटरनेट सेवा बंद (kolhapur internet service latest update) असल्याने युवा वर्गाची विशेषत: नाेकरदार वर्गाची माेठी अडचण झाली आहे. जे नाेकरदार वर्क फ्राॅम हाेम या माध्यमातून कार्यरत आहेत ते काेल्हापूर पाेलिसांना ट्विट (tweet) करुन इंटरनेट सेवा कधी सुरु हाेणार याची विचारणा करु लागले आहेत. (Maharashtra News)

समाज माध्यमातून (social media) ठेवले गेलेल्या वादग्रस्त स्टेटसवरुन संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राज्यातील काेल्हापूरात बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदाेलन छेडले. या आंदाेलनकाळात हिंचाराची घटना घडली. त्यामुळे काेल्हापूरात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण हाेते. गुरुवारी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली.

दरम्यान काेल्हापूर शहर आणि परिसरात शांतता निर्माण करण्यासाठी पाेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. याबराेबरच गेले दाेन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश इंटरनेट पूरवठाधारक कंपन्यांना देण्यात आले.

त्यामुळे काेल्हापूर आणि ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेवर बंधन आली. सर्वच कंपन्यांनी सुविधा बंद ठेवली. त्याचा परिणाम व्यवसाय, बॅंकांवर झाला. सर्वांता माेठी परिणाम युवा वर्गावर झाला.

जे युवक वर्क फ्राॅम हाेमच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांना इंटरनेट बंदचा फटका जाणवत आहे. त्यांचे कामकाज काही अंशी बंद पडल्याने ते नाराज झाले आहेत. आजही अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद आहे तर काही ठिकाणी सेवा काेलमडली आहे.

परिणामी युवा वर्ग काेल्हापूर पाेलिसांना ट्विट करुन सेवा कधी सुरु हाेणार याची विचारणा करीत आहेत. तर काही जण इंटरनेट पेक्षा माध्यमांवर घसरले आहेत. बातम्यांचे चॅनेल बंद ठेवले असते तर बरे झाले असते अशी भावना व्यक्त करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT