गुन्हेवृत्त  Saamtv
महाराष्ट्र

मित्राला वाचवायला गेला आणि जबर मार मिळाला

चार ते पाच व्यक्ती आपल्या मित्राला मारत आहेत हे बघून त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरामध्ये काल सकाळच्या सुमारास दत्त मंदिरासमोर जबरदस्त मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चार ते पाच व्यक्ती आपल्या मित्राला मारत आहेत हे बघून त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दिनेश मारुती दानव (45) असे या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हे देखील पहा -

मारहाण करणार्‍यांनी दिनेश ला फावड्यांनी व काठ्यांनी जबर मारहाण केली आहे. यात दिनेश हा गंभीररीत्या जखमी झाला असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. कोर्टाने चारही आरोपींना पोलिस कस्टडी सुनावली असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहेत. हिंगणघाट शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे.

हिंगणघाट शहराचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दत्त मंदिरापुढे चार व्यक्तींनी एका व्यक्तीला फावड्या, लाठ्यांनी व दगडाने मारहाण केली आहे. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले त्याच वेळेस घटनास्थळाजवळून आमच्या ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व दीपेश ठाकरे तिथून जात असताना मारहाण करणारे आरोपी पळताना दिसले. त्यांनी तात्काळ त्यांचा पाठलाग करून दोन आरोपींना पकडले त्यांनतर दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

SCROLL FOR NEXT