Weather Update in Maharashtra 9 July 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : आजपासून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचे; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

Weather Update in Maharashtra 9 July 2024 : आजपासून पुढील 4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे.

Satish Daud
Maharashtra Rain News

गेल्या ४८ तासांपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.

Heavy rainfall Alert

सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिकांना पावसातून वाट काढावी लागत आहे.

Weather Update in Maharashtra

काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे.

Heavy Rain in Maharashtra

दरम्यान, पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Monsoon Rain

मान्सूनच्या पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील ४ दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert

त्याचबरोबर आणि घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा, तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Raigad Weather Update

किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर आहे. पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.

Konkan Rain News

मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Marathwada Rain Updates

मराठवाडा आणि विदर्भ, तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Mumbai Rain Alert

मुंबईसह उपनगरात येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या विजयी सभेआधी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये झळकले बॅनरस

Most Dangerous River: भारतातील सर्वात धोकादायक नदी कोणती माहित आहे का?

Shahapur : मित्रांसोबत फिरायला गेला तो परतलाच नाही; भारंगी नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Upvas Medu Vada: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा, फक्त १० मिनिटांत घरी तयार

Makeup Hacks: मेकअप केल्यावर चेहरा काळा पडतो का? मग 'या' चुका करणं टाळा नाहीतर होईल स्किन इन्फेक्शन

SCROLL FOR NEXT