Maharashtra Weather Updates Saam TV
महाराष्ट्र

Weather Today : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; पुढील तीन दिवस आणखी धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Updates : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Updates : आधीच शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, त्यातच कापूस घरात पडून. अशा विविध संकटाला तोंड देणाऱ्या बळीराजावर आणखी एक संकट ओढावलं. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आली असताना, अवकाळी पाऊसह गारपीटीचा तडाखा बसला. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे हिरावून गेल्याने जगावं तरी कसं असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. (Latest Marathi News)

राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, असा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने  (Weather Forecast)  दिला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

राज्याच्या विविध भागात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. मुंबईतही गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं  (Weather Updates)  हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीने चांगलाच धुमाकूळ घातला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील 2 ते 3 दिवस गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Edited By - Saiish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT