Weather Update Saam Digital
महाराष्ट्र

Weather Update : पारा ४१ अंशाच्या पार; पुढचे चार दिवस काय असणार स्थिती? जाणून घ्या

Maharashtra Weather Update : विदर्भ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या थरात चक्रावाताची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पुढील तीन दिवस पारा ४१ अंश किंवा त्यापेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

Weather Update

विदर्भ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या थरात चक्रावाताची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पुढील तीन दिवस पारा ४१ अंश किंवा त्यापेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा आणखीन तीव्र होणार आहेत.अकोल्यात ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, परभणी, जेऊर, मालेगाव, सोलापूर या ठिकाणी सुद्धा तापमानात वाढ. कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

राज्यात तापमानाचा पारा सातत्याने (Maharashtra Weather) वर चढत आहे. आज तापमानात कमाल वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या वर जात आहे. मार्च महिन्यातच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. २५ मार्च रोजी मालेगाव येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मालेगावमध्ये सोमवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तिवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तेथे गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा दाट अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पुन्हा एकदा हजेरी लावणार (Maharashtra Weather Forecast) असल्याचं चित्र आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेच्या लाटांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात तापमान चाळीसीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, सिक्कीम, पूर्व झारखंड, छत्तीसगड पूर्व विदर्भ, ( Summer Heat Wave) आणि अरुणाचल प्रदेशांमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, जोरदार वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, खात्यात किती रुपये जमा होणार?

Digital eye strain symptoms: डिजिटल स्क्रीनची सवय ठरतेय डोळ्यांसाठी घातक; दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतोय

Lucky Zodiac Ring: राशीनुसार कोणत्या धातूची अंगठी घालावी? जाणून घ्या शुभ धातू

Maharashtra Live News Update: बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार, अजित पवार एकत्र

Diwali 2025 OTT Release: या दिवाळीत OTT वर होणार मोठा धमाका; 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT