IMD Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Rain Alert: सावधान! पुढील ७२ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार; राज्यातील 'या' जिल्ह्यांना झोडपणार

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यातील अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवू लागला असला, तरी येत्या ७२ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

Satish Daud

Weather Updates 15 March 2024

राज्यातील अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवू लागला असला, तरी येत्या ७२ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रत ढगाळ वातावरण राहील, अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत असून उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह (Heavy Rain) गारपीट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असून विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. (Latest Marathi News)

विदर्भात तुफान पावसाचा इशारा

आयएमडीच्या अंदाजानुसार, उद्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Heavy Rain) होऊ शकतो. याशिवाय खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांची नासधूस झाली होती. आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुढील ७२ तासांत ढगाळ वातावरण राहणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर मुंबईसह पुणे शहरातील तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होणार असून पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

Maharashtra News Live: श्रीक्षेत्र रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

SCROLL FOR NEXT