Maharashtra Rain News Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय, आज तब्बल १७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, वाचा वेदर रिपोर्ट

Weather Forecast Maharashtra : आज रविवारपासून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Satish Daud

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. आज रविवारपासून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामे आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

हवामान विभागाने (IMD Maharashtra Rain Today) दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. उद्या म्हणजेच सोमवारपासून हे क्षेत्र आणखीच ठळक होणार आहे. परिणामी राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, शनिवारी (ता. १७) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चांगलाच चटका जाणवला. ब्रम्ह्यपुरे येथे सर्वाधिक ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (ता. १८) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Alert) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका जाणवणार असून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात आज कुठे-कुठे पाऊस?

हवामान खात्याने आज रविवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये पाऊस पडू शकतो.

तिकडे सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT