Maharashtra Rain News Today Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना आज पाऊस झोडणार, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Satish Daud

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांना देखील पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज रविवारी देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीने (IMD Rain Alert) जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज (Maharashtra Rain News) अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर आणि पालघर जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुबार, धुळे, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लगतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT