Maharashtra Heavy Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashra Rain Alert : परतीचा पाऊस पुन्हा महाराष्ट्राला झोडपणार, आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Heavy Rain Alert : आज बुधवारी देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Satish Daud

गेल्या 15 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केलं आहे. मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता २४) अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं होतं. आज बुधवारी देखील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पावसाने परतीचा प्रवास सुरु केला आहे. सध्या मान्सून पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू करीत असून आता गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.

परिणामी महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून पुढील 4 दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस पडणार आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज कुठे-कुठे पावसाचा अलर्ट

आयएमडीने आज पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतही जोरदार पाऊस कोसळणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई-पुण्यात पावसाचा इशारा

दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. पुढील 4 दिवस संपूर्ण राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

SCROLL FOR NEXT