Rain Alert in Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अलर्ट

Weather Update 20th August 2024 : भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (ता. 20) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

Satish Daud

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सध्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील कामे खोळंबली आहे. दरम्यान, आज मंगळवारी देखील राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (ता. 20) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

मागील आठवड्यापासून हवामानात अनेक मोठे बदल झाले असून सध्या दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. आताही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मान्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून, दिल्ली, कानपूरपर्यंत कमी दाबाचे सक्रिय आहे.

रायलसिमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आलाय. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलंय.

महाराष्ट्रात आज कुठे-कुठे पाऊस?

आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा. तसेच सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT