Vidarbha Weather Forecast saam tv
महाराष्ट्र

Weather Forecast: गारपीटीनंतर आता विदर्भाला उन्हाचे चटके! तापमान 45 पार जाण्याची शक्यता

Vidarbha Weather Forecast : यावर्षीयी विदर्भाचं तापमान 45 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Chandrakant Jagtap

Vidarbha temperature: विदर्भात एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने झोडपल्यानंतर आता मात्र कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते. यावर्षीयी आता तापमान 45 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यात विदर्भाचं तापमान 43 अंशावर गेलं होतं. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापणार असा अंदाज होता. मात्र अचानक वातावरणात बदल होत पाऊस सुरू झाला. जवळपास 15 दिवस सलग पाऊस पडला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि 43 अंशावर गेलेलं तापमान 35 अंशावर आलं.

त्यामुळे काही दिवस उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळाला. एप्रिल महिन्यात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस आणि थंड दिवसांची नोंद झाली. मात्र, आता पावसाळी वातावरण निवळलंय आणि पुन्हा उन्ह तापायला लागलंय. पुढील दिवसांत विदर्भातील तापमान 45 अंशावर जाईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. (Weather Forecast)

मान्सूनबाबत आली मोठी अपडेट

यंदा देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज सोमवारी स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र आता हवामान तज्ज्ञांनी एक चिंता व्यक्त केली आहे. राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT