Weather Update Saam TV
महाराष्ट्र

सावधान! राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट

येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने (Rain) उसंत घेतली. त्यामुळे अनेक भागात नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात काही प्रमाणात घट झाली. मात्र असं असलं तरी, पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता (Weather Update) वर्तवण्यात आली. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Weather Update In Maharastra)

जून महिन्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार पुनरागमन केलं. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Todays Weather Update)

याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान यंदाच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस आठ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान विखुरलेले आणि काही जिल्ह्यांपुरते मर्यादित असले तरी, सततच्या पावसाने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT