Sindhudurg , Nitesh Rane, Vaibhav Naik, Kudal saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg : शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटणार ? राणेंचे 'ते' वक्तव्य आमदार नाईकांच्या जिव्हारी

शिवसेना विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

MLA Vaibhav Naik : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर आज (मंगळवार) आमदार नितेश राणेंनी खालच्या भाषेत टीका केली. राणेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी राणेंच्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच राणेंच्या या वक्तव्यांच्या विराेधात त्यांच्यावर पाेलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे आमदार नाईक यांनी नमूद केले. (vaibhav naik latest marathi news)

आमदार नाईक म्हणाले महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यावर अशा प्रकारे नितेश राणे टीका करत असतील तर महाराष्ट्र सरकार काय कारवाई करणार आहे का ? हा सरकारला आमचा सवाल आहे. पण निश्चितच या वक्तव्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू असेही नाईक यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

नाईक म्हणाले एका सर्वोच्च नेत्याबद्दल अशा पद्धतीने बोललेलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पटतं का ? नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे सातत्याने उद्धव ठाकरेंवर बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा पुढील काळात आम्हांला रस्त्यावरची लढाई करावी लागेल असा थेट इशारा अमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

असं म्हणाले हाेते राणे

उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे काेणतेच गुण नाहीत. ते कधीही थेट बाेलत नाहीत. त्यांच्यात रग नाही, हिम्मत नाही, नपुंसक आहेत. निवडणुक आयाेगनं त्यांच्या पक्षाला चिन्हं म्हणून आइस्क्रीमचा कोन दिला आहे. हे चिन्हं आदित्य ठाकरेंना पाहून दिल्याची खाेचक टीका आमदार नितेश राणेंनी केली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT