Pravin Dhamale Saam TV
महाराष्ट्र

''...अन्यथा देशातील 30 हजार मशिदींवर दावा ठोकू''

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडले असून ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीकडे तोंड करून नंदी भगवान विश्वनाथ यांची प्रतीक्षा करत होते.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

मुंबई: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांनी समजूतदारपणा दाखवून ज्ञानवापी मशिदीचा ताबा सोडावा अन्यथा देशभरात मंदिरे तोडून बांधण्यात आलेल्या तीस हजार मशिदींवर आम्ही दावा ठोकू असा इशारा हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. वाशीतील एका खाजगी कार्यक्रमानिमित्त डॉ. प्रवीण तोगडिया नवी मुंबईत आले असताना उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ज्ञानवापी मंदिर वादावर आपली भूमिका मांडली.

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडले असून ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीकडे तोंड करून नंदी भगवान विश्वनाथ यांची प्रतीक्षा करत होते. याठिकाणी काशीच्या श्रृंगार गौरीचे मंदिर होते हे देखील स्पष्ट झाले असल्याने ज्ञानवापी मशिदीवर मुस्लिमांनी केलेला दावा मागे घ्यावा. या प्रकरणातील वादात आम्ही सर्व पुरावे देणार असल्याचे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अयोध्या दौरा न करता काशीचा दौरा करावा असे विधान देखील डॉ तोगडिया यांनी व्यक्त केलेय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT