water scarcity in lendewadi near beed saam tv
महाराष्ट्र

Water Shortage in Parli : परळीमधील लेंडेवाडीत पाणी टंचाई, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

प्रशासन या गावच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देत टँकर सुरु करावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

विनोद जिरे

Beed :

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असणाऱ्या लेंडेवाडी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामस्थांना पायपीट सुरू आहे. विशेष म्हणजे परिक्षांच्या काळात पाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना देखील भटकावे लागत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लेंडेवाडी गावच्या शिवारा शेजारी असलेले अंबलटेक / चांदापूरचे तलाव आटले आहेत. यामुळे गावच्या ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

प्रशासन या गावच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देत टँकर सुरु करावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास गावातील जनावरांना झाडांना देखील झळा बसतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT