Jaya Saam
महाराष्ट्र

Jaya Bachchan on Kunal Kamra: शिवसेना फोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नव्हता का? कुणाल कामरा प्रकरणावरून जया बच्चन संतापल्या

Shiv Sena Protest Against Kunal Kamra: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरून शिवसैनिकांनी तोडफोड केली. यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना आणि सरकारवर टीका केलीय.

Bhagyashree Kamble

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला विडंबनात्मक गाण्याद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं चांगलंच भोवलं. एकनाथ शिंदे यांच्यावर रचलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कुणाल कामराच्या व्हिडिओवरून राज्यात सध्या गदारोळ सुरू आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी रोष व्यक्त केला. तर काहींनी शिवसैनिकांवर टीका केली. या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना आणि सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कुणाल कामराच्या प्रकरणावर जया बच्चन नेमकं काय म्हणाल्या?

जया बच्चन यांनी कुणाल कामराच्या प्रकरणावर परखड मत मांडलं आहे. 'जर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणार असाल तर, प्रत्येकाला वाईट स्थितीला सामोरे जावे लागेल. अनेक बंधनांचा सामना करावा लागेल. पुढे जाऊन सरकार मीडियावर देखील बंधने आणेल. या बात्मया लावा, या बात्मया लावू नका. या विषयाची बातमी लावू नका. तेव्हा काय कराल? बोलण्याचा स्वातंत्र्य नेमकं कुठे आहे?' असा सवाल जया बच्चन यांनी उपस्थित केला आहे.

जया बच्चन शिवसैनिकांवर संतापल्या

'जेव्हा शिवसैनिक आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात विलीन झाले, सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलला, तेव्हा अपमान झाला नाही का? जेव्हा पक्ष फोडला आणि दुसऱ्या पक्षात विलीन झालात, तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला नव्हता का?' असा सवालही जया बच्चन यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

Drishyam 3 : विजय साळगावकर पुन्हा येतोय! २ ऑक्टोबरला अजय देवगणच्या 'दृश्यम ३'चा थरार, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई

Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड सूत्रधाराचा खात्मा,सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Thane News: शिवसेना नेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा दुसरा VIDEO समोर, गोळीबाराचा आवाज ऐकून पळापळ

Gold Price Today: सप्टेंबरच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा कितीला? २४, २२ अन् १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT