Washim Accident News 
महाराष्ट्र

Accident : २ वर्षांपूर्वी सुदैवानं वाचला, आता काळाने घाला घातला; ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू

Washim Accident News : वाशीममध्ये रस्ते अपघातामध्ये २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झालाय. रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळला अन् दबून तरूणाचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Washim tractor accident News : वाशीममध्ये रस्ते अपघातामध्ये २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झालाय. रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळला अन् दबून तरूणाचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव अर्जुन मदन भडके असे आहे. अर्जुन याचा दोन वर्षांपूर्वीही अपघात झाला होता, त्यावेळी सुदैवाने तो वाचला होता. २ एकर जमीन विकून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. पण आता काळाने पुन्हा घाला घातला अन् त्याचा मृत्यू झाला.

वाशीम ते रिसोड मार्गावर हराळ फाट्याजवळ ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळल्याने या ट्रॅक्टरखाली तरुणाचा दबून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या अपघातात 21 वर्षीय तरुणचा मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या तरुणाचं नाव अर्जुन मदन भडके असं आहे. हा तरुण हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवाशी होता.

रिसोड इथून ट्रॅक्टरचे काम संपल्यानंतर अर्जुन फडके हा ट्रॅक्टर घेऊन रात्री हिंगोलीकडे निघाला होता. त्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उलटला. अपघातानंतर अर्जुन ट्रॅक्टरखाली दबला, रात्रीची वेळ असल्यामुळे मदतीसाठीही कुणी नव्हतं. त्यात त्याचा मृत्यू झाला.

मयत अर्जुन हा दोन वर्षांपूर्वी दुचाकीच्या भीषण अपघातातून बचावला होता. त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांचा त्यावेळी अपघातात मृत्यू झाला होता. तीन महिने उपचार केल्यानंतर तो बरा झाला होता. मात्र दोन वर्षानंतर परत एकदा अर्जुनला अपघाताने गाठले व त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे कुटुंबीय व गावाकऱ्यावर शोककळा पसरलीय.

कुटुंबियांनी अर्जुनचा उपचार करण्यासाठी दोन एकर शेती विकली होती. स्वत:च्या पायावर उभं राहिल्यानंतर पुन्हा तो काम करण्यासाठी घराबाहेर पडला. काही दिवसांपूर्वीच तो ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला गेला होता. पण मध्यरात्री पुन्हा काळाचा घाला घातला अन् जीव गेला. अर्जुनच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump tariff policy : रशियाच्या रागानं ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब फुटला, जागतिक दबावापुढे टाटा बायबाय?

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

Success Story: २० वेळा फेल, एकदा नव्हे तर दोनदा UPSC पास; विवेक यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Coffee Pudding Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी कॉफी पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT