Samruddhi Mahamarg Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: डुलकी आली अन् झाला अपघात; चारदा पलटी होत कार दुसऱ्या साईडला, तीन जखमी

झोपेची डुलकी आली अन् झाला अपघात; चारदा पलटी होत कार दुसऱ्या साईडला, तीन जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोज जैसवाल

वाशिम : नागपूरवरून कोल्हापूरसाठी निघालेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) कार चालकाला डूलकी लागली. यात कारचा अपघात (Accident) झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या १६९ हद्दीत घडला आहे. यात कारमधील तीन जण जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

समृद्धी महामार्गावरून कोल्‍हापूरकडे जात असताना सदर अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळतात तात्काळ लोकेशन समृद्धी हायवे १०८ पायलट आशिष चव्हाण, डॉ.गणेश हे घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आफिफा, सिस्टर मनवर कक्षा सेवक सचिन हनवंते श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख मास्को सिक्युरिटी सागर खंडारे व (Samruddhi Mahamarg) समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार यांनी मदत केली.

वेगात असल्‍याने कार चार वेळेस पलटी

कारचा वेग अधिक असल्‍याने या अपघातात कारने तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली. यात प्रमिला विश्वकर्मा (वय ३७), उमाशंकर विश्वकर्मा (वय ४५) व सत्यम विश्वकर्मा (वय २२) सर्व रा. कोल्हापूर हे तीन जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT