Toll Plaza Worker Strike Saam tv
महाराष्ट्र

Toll Plaza Worker Strike : समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल प्लाझावरील कामगारांचे कामबंद; तीन महिन्यांपासून वेतन नाही

Washim News : समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात आले आहेत. या टोल प्लाझावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल

वाशिम : मागील तीन महिन्यांपासून टोल कामगारांचे वेतन देण्यात आलेले नाही. वेतन थकल्यामुळे समृद्धी महामार्गवरील (Washim) वाशिमच्या कारंजा येथील टोल प्लाझावरील कामगारांनी मनसेच्या (MNS) नेतृत्त्वात रात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे टोल बुडत आहे. (Live Marathi News)

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अनेक ठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात आले आहेत. या टोल प्लाझावर (Toll Plaza) कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कारंजा येथील टोल प्लाझावर असलेल्या टोल कामगारांचे वेतन तीन महिन्यापासून थकले आहे. वेतन मिळण्याबाबत अनेकदा मागणी करून देखील हक्काचा पगार वेळेत मिळत नसल्यामुळे कामगारांवर कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे या कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारंजा येथील टोल कामगारांच्या आंदोलनात सहभागी होत मनसेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात करण्यात आले. यावेळी मनसेसह टोल कामगार सहभागी झाले होते. रात्रीपासून कामबंद करत आज सकाळी या कामगारांनी घोषणाबाजी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT