Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : सलग तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई, योजनेचे काम अपूर्ण; संतप्त महिलांची पंचायत समितीवर धडक

Washim News : वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील मोप येथे जलजीवन मिशन अंतर्गत मागील तीन वर्षापासून योजनेचे काम मंजूर झाले आहे. सदर योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही यामुळे गावात पाणीटंचाई

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथील महिला पाण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागण्यासाठी आज मोप येथील महिलांनी रिसोडच्या पंचायत समितीवर धडक दिली. यावेळी पंचायत समितीचे बीडीओ गैरहजर असल्यामुळे महिला आणखीनच आक्रमक झाल्या. 

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील मोप येथे जलजीवन मिशन अंतर्गत मागील तीन वर्षापासून योजनेचे काम मंजूर झाले आहे. सदर योजनेचे काम अजूनही सुरू असून, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांपासून गावात हि समस्या कायम असून उन्हाळ्यात अधिक पाणी टंचाईची भीषणता अधिक जाणवत असते. 

महिलांनी काढला हंडा मोर्चा 

उन्हाळ्याची चाहूल लागताच हंडावर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आज मोप येथील महिलांनी रिसोड पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. याठिकाणी प्रचंड घोषणाबाजी देखील केली. मात्र पाणी टंचाईचे गाऱ्हाणे एकूण घेण्यासाठी बीडीओ नसल्याने महिला अधिकच आक्रमक झाल्या होत्या. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

एक महिन्याचा अल्टिमेटम 

पाणी टंचाईच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर निवेदन देण्यासाठी आले असताना रिसोड पंचायत समितीचे बीडिओ हजर नव्हते. त्यामुळे महिला आणखीनच आक्रमण झाल्या होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी उत्तर दिल्यामुळे महिला आणखीनच आक्रमक झाल्या होत्या. एका महिन्याच्या आत पाणीपुरवठा पूर्ण केल्यास आंदोलन करण्यात इशारा यावेळी महिलांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT