Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : ३०० हुन अधिक घरकुलांचे अनुदान रखडले; वाशिम तालुक्यातील लाभार्थी अडचणीत

Washim News : गरजू आणि घरांपासून वंचित असलेल्या गरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना व मोदी आवास योजनेचा लाभ दिला जात असतो.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: ग्रामीण भागात रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. अर्थात लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीतून चांगले घर बांधून निवासाची व्यवस्था होत असते. त्यानुसार वाशिम तालुक्यात घरकुल मंजूर झालेल्या ३०० हुन अधिक घरकुलांचे अनुदान रखडले आहे. यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. 

गरजू आणि घरांपासून वंचित असलेल्या गरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना व मोदी आवास योजनेचा लाभ दिला जात असतो. (Gharkul Yojana) या योजनेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येत असून शासनाकडून साधारण दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असते. अनुदानाची हि रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असते. हे अनुदान चार हप्त्यांमध्ये दिले जात असते. अर्थात काम सुरु झाल्यानंतर पहिला हप्ता खात्यात जमा केला जात असतो. 

घरकुल बांधकामाच्या टप्यानुसार लाभार्थीना चार हप्त्यात अनुदानाची रक्कम बँक खात्यात पाठविली जाते. घर बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव दिल्यावर रक्कम जमा होते. त्यानुसारच घर बांधकामाचा टप्पा जसजसा पूर्ण होत जातो; त्यानुसार शासनाकडून अनुदानाची रक्कम अदा केली जात जाते. मात्र (Washim News) वाशीम तालुक्यातील लाभार्थ्यांनी काम सुरु केल्यानंतर या रक्कमेची प्रतीक्षा आहे.  

३०० लाभार्थ्यांना प्रतीक्षा 

मागील अनेक दिवसांपासून वाशिम तालुक्यात रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थीना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करून पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. तरी देखील जवळपास ३०० पेक्षा अधिक लाभार्थीच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळं लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT