Washim Crime Saam tv
महाराष्ट्र

Washim Crime : मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक, वाशिममध्ये तणाव, सहा जणांना घेतले ताब्यात

Washim News : दगडफेकीच्या घटनेनंतर याचे पडसाद शहरातील आजूबाजूच्या परिसरात देखील उमटल्याचे पाहण्यास मिळाले. यात दांडे चौक, गणेशपेठ परिसर, बागवान पुरा या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिम शहरातील पाटणी चौकात दोन गटांमध्ये अचानक वाद झाल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. याच दरम्यान दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी येत नियंत्रण मिळविले. मात्र परिसरात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले. 

वाशिम शहरातील पत्नी चौक परिसरात १२ मे च्या रात्री काही कारणात्सव दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या वादात दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीच्या घटनेनंतर याचे पडसाद शहरातील आजूबाजूच्या परिसरात देखील उमटल्याचे पाहण्यास मिळाले. यात दांडे चौक, गणेशपेठ परिसर, बागवान पुरा या भागात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. 

घरांवर दगडफेक, गाड्यांचे केले नुकसान 

रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला. दोन समाजातील समाजकंटकांनी परिसरातील काही घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. यात गाड्यांचे नुकसान देखील झाले आहे. तसेच तीन ते चार नागरिक यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. 

सहा जणांना घेतले ताब्यात 

वाशिम शहर पोलिसांनी परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. तर पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून कोणतीही अनुचित घटना घडू नये; यासाठी पोलीस सतर्क असल्याची माहिती वाशिम शहर पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ग्लोइंग स्कीनसाठी प्या पपई स्मूदी; जाणून घ्या फायदे

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

Dashank Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार दशांक योग; या राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या अंधेरीतील पीएमजीपी कॉलनीत छत कोसळले

SCROLL FOR NEXT