Washim Crime saam tv
महाराष्ट्र

Washim News: तुझ्याशी लग्न करते म्हणत विवाहितेने युवकाकडून उकळले पैसे, अनेकदा तर...

woman cheated youth showing lure of marriage : मी माझ्या नवऱ्याला सोडून देते आणि तुझ्याशी लग्न करते असे म्हणत विवाहितेने तरुणाची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केली.

Chandrakant Jagtap

>> मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Washim Crime : वाशिमध्ये एका विवाहितेने तरुणाला लग्नाचं आमिष दाखवत त्याच्याकडून पैसे उकळ्याची घटना समोर आली आहे. मी माझ्या नवऱ्याला सोडून देते आणि तुझ्याशी लग्न करते असे म्हणत विवाहितेने तरुणाची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केली. या प्रकरणी पीडित तरुणाने वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीममधील हे तरुण-तरुणी असून त्यांचे दोघांचे तरुणीच्या लग्नाआधी एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र या दोघांच्या नात्याला घरच्यांचा विरोध असल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतरही ती या तरुणाच्या संपर्कात राहिली. तरुणीच्या लग्नानंतरही त्यांच्यात संवाद सुरु होता. या दरम्यान विवाहितेने पीडित तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळले.

मी माझ्या नवऱ्यापासून फारकत घेते आणि तुझ्याशी लग्न करते असे अश्वासन या विवाहितेने पीडित तरुणाला दिले. तिच्यावर असलेल्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याने अनेकदा तिला पेसे दिले. मात्र तिने त्याच्या शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाशीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाशीम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वाशीममधील या पीडित युवकाचं नात्यातील मुलीवर प्रेम होते. परंतु घरचा विरोध असल्याने तिने दुसऱ्या मुलासोबत लग्न केले. परंतु तिने लग्नानंतरही पीडित युवकास भुलथापा मारत मी फारकत घेऊन तुझ्याशी लग्न करते म्हणून वारंवार पैश्याची मागणी केली. पीडित तरुणाने अनेकदा तिला पैसेही दिले. (crime news)

मात्र पैश्याची मागणी वाढत गेली. विवाहितेने लग्नाचे आमिष दाखवून आपली शारीरिक व आर्थिक फसवणूक केली हे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर त्याने वाशीम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. आता पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Basundi Recipe: सणासुदीला घरी बनवा गोड बासुंदी; सोपी रेसिपी वाचा

Nashik Flood : गोदावरीला पूर, अनेक वाहनं अडकली | VIDEO

SCROLL FOR NEXT