Washim News Saam tv
महाराष्ट्र

Solar Project : वाशिम जिल्ह्यात उभे राहणार पाच सौर प्रकल्प; राज्य सरकारकडून मान्यता

Wshim News : राज्य सरकारने वाशिम जिल्ह्यात पाच सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी मान्यता दिली असून त्यातून १७० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : वाशिम जिल्ह्यात पाच सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून साधारण १७० मेगावॅट वीज निर्मिती होणार असून या प्रकल्प उभारणीसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात देखील करण्यात आली आहे.

राज्य सरकारने वाशिम (Washim) जिल्ह्यात पाच सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीसाठी मान्यता दिली असून त्यातून १७० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील दुधखेडा येथे ६० मेगावॅट, पार्डी टकमोर येथे ३० मेगावॅट, बाभुळगाव आणि सायखेडा येथे २० मेगावॅट तर मंगरूळपिर तालुक्यातील कांझारा येथे ४० मेगावॅट क्षमतेचा (Solar Energy) सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे महानिर्मितीकडून वीज निर्मिती प्रकल्पावरील लोड कमी होणार आहे. 

हे प्रकल्प उभारणीसाठी जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असून यातील काही प्रकल्पांची जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाली असून दुधखेडा येथील जमिनीला सध्या तार कंपाउंड करण्याचे काम सुरू आहे. तर वाशिमसह इतर तीन जिल्ह्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्य सरकारने १४९४ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT