Bribe ACB Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe ACB Trap: दुचाकी परत करण्यासाठी घेतली लाच; पोलीस कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

दुचाकी परत करण्यासाठी घेतली लाच; पोलीस कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

वाशिम : पोलीस हेड कॉन्स्टेबलला तेराशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात (Washim) अटक केली आहे. शफीक अहेमद रफिक अहेमद खान असं (Bribe) लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच नाव आहे. (Breaking Marathi News)

वाशिमच्या जऊळका पोलीस स्टेशमध्ये गुन्ह्यात दुचाकी जप्‍त केली होती. सदरची जप्त केलेली दुचाकी संबंधीतास परत करण्यासाठी पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल शफीक खान यांनी दोन हजार रूपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडी अंती १ हजार ३०० रूपये निश्‍चीत झाले होते. याबाबत तक्रारदाराने वाशिमच्‍या लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.

वाशिम लाचलुचपत विभागाकडे (ACB) प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करून पथकाने सापळा रचला. यानंतर पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल खानने तेराशे रूपये तक्रारदाराकडून स्‍वीकारताच पथकाने लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : टॅक्स भरतो… मग रस्ता कुठे? रस्त्यांच्या दुरवस्थेवरून महिला संतापल्या, KDMC विरोधात आंदोलन

Fujian Aircraft: चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' नौदलात दाखल

Girija Oak : अभिनेत्री गिरीजा ओक मूळची कुठली, वय किती?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील शिवाजी चौकात भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जल्लोष

तेजस्वी यादव यांचं कुठे गणित फिसकटलं? या पाच कारणांमुळे निवडणुकीत अपयश आलं?

SCROLL FOR NEXT