Risod vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Risod vidhan Sabha : वाशिमच्या रिसोड मतदारसंघात भाजपकडून बंडखोरीचे संकेत; उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुक लढण्यावर ठाम

Washim News : राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु आहे. सर्वच पक्षांकडून जवळपास उमेदवारी निश्चित झाली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात महायुतीत उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली असताना माजी खासदार अनंतराव देशमुख आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अनंतराव देशमुख यांचा मुलगा तथा भाजपचे विधानसभा प्रमुख नकुल देशमुख यांनी सांगितले आहे. भाजपने जर उमेदवारी दिली नाही; तरी आम्ही निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु आहे. सर्वच पक्षांकडून जवळपास उमेदवारी निश्चित झाली असून काही जागांवर तिढा कायम आहे. तर बहुतांश ठिकाणी नाराज असलेल्या पदाधिकार्यांकडून बंडखोरी केली जात आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. असाच प्रकार (Washim) वाशिमच्या रिसोड मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी भाजपकडून बंडखोरी करण्याचे संकेत दिले जात आहेत.  

रिसोड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीची उमेदवारी माजी मंत्री अनंतराव देशमुख यांना दिली होती. मात्र, रविवारी शिवसेनेकडून उमेदवारी दिल्याच यादीमधून समजलं. तरी आम्ही पक्षाने सांगितल्यानुसार भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. निश्चित या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असे संकेत पक्षाने आम्हाला दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makhana Benefits: रोज संध्याकाळी भूक लागल्यावर मखाना खल्ल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात साडेचौदा हजार विद्यार्थी आज नीटची परीक्षा देणार

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT