Washim  Saam Tv
महाराष्ट्र

Washim: आधी 8 वर्षीय मुलाचा मृतदेह, दुसऱ्या दिवशी त्याच विहिरीत वडिलांचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

वाशिममध्ये विहिरीत एका 8 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम: वाशिममध्ये विहिरीत एका 8 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी त्याच विहिरीत बापाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरात ही घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रविवारी सायंकाळी महेश कालापाड या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. तर सोमवारी सकाळी त्याच विहिरीत वडील महादेव कालापाड यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी तसेच रोसयोची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात येणार आहे.

वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरात मृतक मुलगा महेश आणि वडील महादेव कालापाड हे शेंदुर्जना मोरे येथील रहिवाशी आहेत.विहिरीत दोन मृतदेह आढळल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल 8 वर्षीय महेश आणि आज वडील महादेव यांचा मृतदेह विहिरीत मिळाल्याने घरगुती वादातून आत्महत्या की घातपात याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. दरम्यान, याचा पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करीत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT