farmer earns 15 lakh from 2 acres using triple cropping Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Farmer : २ एकरात ३ पिके अन् १५ लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याचा 'हा' फॉर्म्युला पाहून कृषी तज्ञही चक्रावले

Turmeric Cauliflower Soybean Farming : वाशीमच्या पांडवउमरा येथील शेतकरी महादेव ढोबळे यांनी २ एकरात हळद, फ्लॉवर आणि सोयाबीनची तिहेरी पीक पद्धती अवलंबून मागील वर्षी तब्बल १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

Namdeo Kumbhar

मनोज जैयस्वाल, साम टीव्ही प्रतिनिधी

farmer earns 15 lakh from 2 acres using triple cropping : शेतीत रोज नवनवीन प्रयोग करून लाखो रुपयांची कमाई करता येते, हे राज्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पारंपरिक शेती पद्धतीला छेद देत या शेतकऱ्याने आपल्या अवघ्या २ एकर जमिनीत एकाच वेळी तीन पिकांची (तिहेरी पीक पद्धती) यशस्वी लागवड केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या ५ वर्षांपासून ते हा यशस्वी प्रयोग करत असून, मागील वर्षी त्यांनी या २ एकरांतून तब्बल १५ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळवले आहे. एकाच शेतात योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेले हे उत्पन्न पाहून स्थानिक कृषी तज्ज्ञही अचंबित झाले असून, इतर शेतकऱ्यांसाठी हा फॉरम्युला एक उत्तम वस्तुपाठ ठरत आहे.

वाशीम जिल्ह्यातील पांडवउमरा येथील शेतकरी महादेव ढोबळे हे गेल्या पाच वर्षांपासून एकाच वेळी हळद, फ्लॉवर (गोभी) आणि सोयाबीन अशा तिहेरी पिकांची लागवड करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. यंदाही त्यांनी आपल्या २ एकर शेतात हळद पिकात फ्लॉवर आणि सोयाबीनची आंतरपीक म्हणून लागवड केली असून, ही तिन्ही पिके सध्या चांगलीच बहरली आहेत.

गेल्या वर्षीही त्यांनी अशाच पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर तब्बल १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते, अशी माहिती ढोबळे यांनी दिली. यामध्ये त्यांना ८० क्विंटल हळद आणि १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले होते, तर केवळ फ्लॉवरच्या विक्रीतून २ लाख रुपये मिळाले होते. यंदाही त्यांना अशाच प्रकारच्या भरघोस उत्पन्नाची अपेक्षा आहे.

केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता तीन पिकांची योग्य नियोजनबद्ध लागवड करून कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न घेता येते, हेच महादेव ढोबळे यांनी आपल्या या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे. शेतकरी महादेव ढोबळे यांचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकर्‍यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणारा आहे. दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल आणि पिकांच्या अनिश्चित भावाच्या पार्श्वभूमीवर, अशा प्रकारची 'तिहेरी पीक पद्धती' शेतीतील आर्थिक धोका कमी करून शेतकर्‍यांचे उत्पन्न शाश्वत ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मार्ग ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

'त्या' महिलेची अशी प्रसूती तुम्ही कधीच ऐकली नसेल! ३ बाळांच्या जन्माने डॉक्टरही झाले चकित...

SCROLL FOR NEXT