Washim Crime News Saam tv
महाराष्ट्र

Washim Crime: तीन दिवस अन् २ हत्या, भयंकर घटनांनी वाशिम जिल्हा हादरला; नेमकं काय घडलं?

Washim Latest News: भयंकर घटनांमुळे पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी

Washim Crime News:

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन दिवसात दोन हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या भयंकर घटनांमुळे पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Crime News In Marathi)

राज्यामध्ये वारंवार गंभीर गुन्ह्यांच्या घटना (Crime News) समोर येत आहेत, त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाच नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. वाशिम जिल्ह्यात अवघ्या तीन दिवसांत दोन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाशिमच्या (Washim) मालेगाव तालुक्यातील एरंडा गावात ५० वर्षीय युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गजानन सपाटे असे या मृत युवकाचे नाव असून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने डोक्यात रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी 4 महिला आरोपींना अटक केली असून इतर 5 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

याआधी शिक्षक दिपक सोनुने यांना जुन्या शेतीच्या वादातून रस्त्यात अडवून अज्ञातांनी हल्ला करत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला होता. यामध्ये उपचारदरम्यान सोनवणे यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. अवघ्या तीन दिवसांत झालेल्या दोन हत्यांनी अवघा जिल्हा हादरुन गेला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

SCROLL FOR NEXT