Hinganghat News Saam Tv
महाराष्ट्र

Hinganghat News: हिंगणघाटात एकाच वेळी 6 ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर छापा; वर्धा पोलिसांची धडक कारवाई

Crime News: पोलिसांनी १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २७ जुगाऱ्यांना अटक केली.

Shivani Tichkule

चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime News: हिंगणघाट शहरात सुरु असलेल्या सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, क्राईम इंटेलिजन्स पथक आणि सायबर सेल पथकाने एकाचवेळी छापा टाकून लॅपटॉपसह जुगारातील इतर साहित्य असा एकूण तब्बल १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २७ जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्रीला करण्यात आली. (Latest Marathi news)

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ऑनलाईन जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या निर्देशान्वये पोलिसांची (Police) विविध सहा पथके तयार करुन हिंगणघाट शहरातील आठवडी बाजार, विर भगतसिंग वॉर्ड, श्रीराम टॉकीज रोड या परिसरात एकाच वेळी छापे मारण्यात आले.

दरम्यान, आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ६ दुकानांमध्ये वेगवेगळया कंपनीच्या जुगाराच्या मशीन्स लावून तसेच संगणकावर आणि लॅपटॉपवर इंटरनेट व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार व इतर प्रकारचे जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले. (Maharashtra News)

पोलिसांनी सुमारे सहा दुकानातून ८ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ४४ जुगार खेळण्याच्या मशीन्स, पाच संगणक, एक लॅपटॉप, विविध कंपनीचे ३ लाख १९ हजार रुपयांचे २३ मोबाईल, ५ प्रिंटर आणि ३१ हजार हजार ४७० रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य २२ हजार असा एकूण १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT