Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : नवीन घरात जाण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण; भिंतीवर पाणी मारताना झाला घात, महिलेचा मृत्यू

Electric Shock : भारसवाडा येथील राजेंद्र पन्नासे यांना तीन महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या मंजूर घरकुलाच्या बांधकामला सुरवात करण्यात आली होती

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: नवीन घराचे बांधकाम सुरु होते. भिंती बांधल्या गेल्याने या बांधकामावर पाणी मारण्यासाठी महिला गेली होती. पाणी मारत असताना महिलेला विजेचा जोरदार झटका बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना आष्टी तालुक्यातील भारसवाडा गावात घडली असून घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

भारसवाडा (ता. आष्टी) येथील संगीता पन्नासे असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. भारसवाडा येथील राजेंद्र पन्नासे व संगीता पन्नासे यांचे गावात हॉटेल आहे. राजेंद्र पन्नासे यांना तीन महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या मंजूर घरकुलाच्या बांधकामला सुरवात करण्यात आली होती. घराचे काही काम झाले आहे. यामुळे बांधकाम पक्के होण्यासाठी पन्नासे दाम्पत्य नियमित पाणी मारत असतात. 

पाणी मारताना झाला घात  

दरम्यान आज सकाळी संगीता यांनी हॉटेल उघडले. यानंतर पती राजेंद्र यांना दुकानात बसवून त्या नव्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या. पाणी मारून झाल्यावर त्यांनी पिलरच्या लोखंडी आसारीला हात लावला आणि काळाने डाव साधला. हात लावला त्या ठिकाणी वीजपंपाची वायर होती. यामुळे वीजेचा झटका लागताच संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेजारी महिलांना माहिती झाली. त्यांनी राजेंद्रशी संपर्क साधला. 

पत्नीच्या मृत्यूची बातमी एकताच पती बेशुद्ध 

नविन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती पती राजेंद्र यांना मिळताच त्यांना धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले. गावकऱ्यांनी त्यांना धीर देत शुद्धीवर आणले. यानंतर राजेंद्र हे तत्काळ बांधकामस्थळी पोहचले. वीज पुरवठा बंद केला. यानंतर संगीता यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता संगीताला मृत घोषीत केले. या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT