महाराष्ट्र

Wardha News: रेल्वे रुळावरून जाणाऱ्यांना रेल्वेची धडक, दोघांचा चिरडून मृत्यू

Wardha Two Men Died In Railway Accident: अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सेवाग्राम पोलिसांची टीम दाखल झाली. दोघेही वरुड गावातीलच रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

रेल्वे रुळावरून पायी जाणाऱ्या दोघांना रेल्वेची धडक बसली असून यात या दोघांचा मृत्यू झालाय. पाठी मागून येणाऱ्या रेल्वे गाडीची जबर धडक बसल्याने दोघांचाही यात मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज दुपारच्या सुमारास वरुड रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नागरिकांची मोठी गर्दी उसळली.

अर्जून परचाके (५२), भूजंग पाटील (३५) दोन्ही रा. वरुड अशी मृतांची नावे आहे. मृतक दोघेही हे वरुड रेल्वेस्थानक पासून सेलूकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाने पायदळ जात होते. याचवेळी त्याच्या मागून आलेल्या रेल्वे गाडीने दोघांनाही धडक दिली. या धडकेनंतर हे दोघेही रेल्वेखाली आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सेवाग्राम पोलिसांची टीम दाखल झाली. दोघेही वरुड गावातीलच रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

अपघातस्थळी गावकऱ्यांची देखील मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांकडून पंचनामा सुरू असून याची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतलीय.

शिक्षकाने पत्नी मुलीसह संपवलं जीवन

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये धक्कादायक घटना घडली होती. शहरातील शिक्षक असलेल्या आई, वडील आणि मुलगी अशा तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना दुपारच्या वेळी घडली. या धक्कादायक घटनेमुळे गोदा काठ थरारला असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकलेले नाहीये.

गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी आणि मुलीसह गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून परभणीकडे जवळच जाणाऱ्या लोहमार्गावर गोदावरी नदी पुलाच्या पुढे रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपत कोळसा वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक रेल्वेखाली आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT