Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

विषारी सापाच्या दंशाने बहिण- भाऊ गंभीर; प्रकृती चिंताजनक

विषारी सापाच्या दंशाने बहिण- भाऊ गंभीर; प्रकृती चिंताजनक

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे बहिण– भावाला विषारी सापाने दंश केला. यात बहीण भावाची प्रकृती चिंताजनक असून वर्धेच्या सेवाग्राम येथील रुग्णलयाच्या (Hospital) अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरु आहे. मण्यार या विषारी सापाने दंश (Snake Bite) केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सापाच्या दंशाने दोघांनाही अर्धांगवायूचा त्रास झाला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून दोघेही सध्या व्हेंटिलेटरवर आहे. (Wardha News Snake Bite)

गिरड येथील पेठ (Wardha) परिसरात असलेल्या राजू नेहारे यांच्या 15 वर्षीय योगेश आणी 18 वर्षीय योगिता या दोघांना रविवारी रात्री सापाने दंश केला. रात्रीच्या गाढ झोपेत सापाने दोघांना दंश केला असावा. सोमवारी सकाळच्या सुमारास या दोघांना अचानक अशक्तपणा, चक्कर येणे आणी डोळ्याने काहीही दिसत नसल्याची बाब यांनी आपल्या पालकांना सांगितली.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

पालकांनी दोघांना गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी नेले असता प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सध्या बहिण-भावावर सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीप्रकाश कलंत्री यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT