Wardha Crime  Saamtv
महाराष्ट्र

Wardha Crime: टीप मिळताच सापळा रचला.. कारसह १० लाख रुपयांचा दारूसाठा जप्त; वर्ध्यात उपविभागीय पथकाची मोठी कारवाई

Crime News In Marathi: नाकाबंदीवेळी एक संशयास्पद कार पोलिसांना आढळली. पोलिसांनी कारला थांबवून तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळला.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा| ता. १४ डिसेंबर २०२३

Wardha Crime News:

वर्धा शहरातून मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून कारसह १० लाख २ हजार ४०० रुपयांचा दारूसाठा जप्त करत दोघांना अटक केली आहे.वर्धा उपविभागीय पोलिस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. (Crime News in Marathi)

यवतमाळ जिल्ह्यातून वर्धा शहरात (Wardha) मोठ्या प्रमाणात दारूसाठा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरात बुरड मोहल्ला परिसरात नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीवेळी एक संशयास्पद कार पोलिसांना आढळली. पोलिसांनी कारला थांबवून तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळला.

पोलिसांनी कारसह दारूसाठा जप्त करून आरोपी शाहरूख जलील बेग (२६, रा. गोंड मोहल्ला), पियुष राजेश परतेकी (२२, रा. महादेवपुरा) यांना अटक केली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींनी हा दारूसाठा यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) कळंब येथील मुकेश जयस्वाल याला फोनवर ऑर्डर दिल्यानंतर त्याने कळंब बायपासच्या मोकळ्या जागेत आणून दिल्याचे सांगितले. बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही आरोपींना दारूसाठा पुरविल्याने मुकेश जयस्वाल व नोकर किसना लाखीया यांनाही आरोपी बनवत गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

१५ तरुणींवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा धमक्या, नराधमाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत गाडला, मुलाला लिहिलेल्या चिठ्ठीने बेरोजगार पतीचे बिंग फुटलं, नेमकं घडलं काय ?

SCROLL FOR NEXT